“श्रद्धांजली सभा“

21 Feb 2022 16:54:36
                                                                 “श्रद्धांजली सभा“
 
आपणा सर्वांस कळविण्यास खेद होत आहे की आपल्या संस्थेच्या संस्थापिका व कोषाध्यक्षा व माजी आमदार कै.
श्रीमती संजीवनीताई रायकर यांना शनिवार दि. ५ फेब्रुवारी २०२२ रोजी देवाज्ञा झाली.
 
त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी त्यांच्या बाराव्याचे कार्य ज्ञान प्रबोधिनी यांच्या द्वारे बुधवार दि. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत करण्याचे योजले होते.
 
त्याच दिवशी संस्थेचे कार्यवाह श्री. श्रीकांत जोशी यांनी दुपारी ३ ते ५ या वेळेत शोकसभा आयोजित केली होती.
 
या सभेत काही उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करून कै. श्रीमती रायकर ताईना श्रद्धांजली अर्पित केली.
श्री. उल्हास वडोदकर - शिक्षक परिषद , श्री. अनंत शर्मा, कार्याध्यक्ष - शिक्षक परिषद,
श्री. शिवनाथ दराडे - शिक्षक परिषद, श्री. दिलीप आवारे - शिक्षक परिषद व बालमोहन विद्यामंदिर,
श्री. चंद्रकांत चव्हाण, अध्यक्ष – अमल विद्या वर्धिनी, श्री. उल्हास कुलकर्णी – मुलुंड नाईट हायस्कूल, श्री. प्रमोद कुलकर्णी – जनकल्याण बँक, श्रीमती शोभा जोशी – अलिबाग प्रकल्प प्रमुख,
श्रीमती नीता भागवत – कांजूर प्रकल्पातील एक कार्यकर्ती, श्रीमती सचिता देवरुखकर – आस्थापन कर्मचारी

Shraddhanjali
Shraddhanjali
Shraddhanjali 
Powered By Sangraha 9.0