वात्सल्य ट्रस्ट मुंबई - गगनाला पंख नवे पुरस्कार २०२२
मिती क्रिएशन्सच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘गगनाला पंख नवे’ हा भव्य पुरस्कार सोहळा शनिवार दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या आणि मान्यवरांच्या उदंड प्रतिसादात पार पडला. निवड समिती सदस्य वर्षा पवार-तावडे, विजय कुवळेकर आणि निवड समिती अध्यक्षा डॉ.स्नेहलता देशमुख कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचबरोबर नवनीत फाउंडेशनचे सुनीलभाई गाला, नायकेम सोल्युशन्सचे राजन राजे आणि डॉ. लीना राजे, कर्करोग तज्ञ डॉ. संजय दुधाट हे मान्यवर देखील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
पुण्याचा पुष्कराज फडणीस, मुंबईची ऋचा शेरे आणि अकोल्याचे विशाल कोरडे या व्यक्ती तसंच आशादीप मतीमंद मुलांचा पालक संघ, रत्नागिरी, *वात्सल्य ट्रस्ट मुंबई* आणि अमेय पालक संघटना डोंबिवली या संस्था यावर्षीच्या गगनाला पंख नवे या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. याचबरोबर अमरावती येथील NAWPH या संस्थेला लक्षवेधी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
वात्सल्य ट्रस्ट मुंबई २००५ पासून दिव्यांग पुनर्वसंनकेंद्राच्या माध्यमातून गेली १७ वर्षे या क्षेत्रात काम करत आहे. केवळ मुंबई, नवी मुंबई व अलिबाग येथील संस्थेच्या केंद्राच्या सोबतच महाराष्ट्रातील अनेक संस्थांसोबत आपण समाजातील दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात राहण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. या सर्व वाटचालीत केंद्रातील सर्व कुशल तज्ञ, धडाडीचे कार्यकर्ते,व द्रष्टे विश्वस्त व देणगीदार या सर्वांचा मोलाचा वाट आहे. गगनाला पंख नवे हा पुरस्कार आपल्या कामाला मिळालेली कौतुकाची थाप आहे.