वात्सल्य ट्रस्ट, मुंबई
वार्षिक स्नेहसंमेलन दि. २८.०१.२०२३
स्थळ - बी.एन.वैद्य सभागृह – दादर, वेळ – सायं. ५ ते ९
प्रमुख पाहुण्या – श्रीमती हर्षदा खानविलकर - सुप्रसिद्ध अभिनेत्री, प्रमुख वक्ते – श्री. सुनील तावडे - सुप्रसिद्ध अभिनेता
सर्वप्रथम पाहुणे, मान्यवर व उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर पाहुण्यांच्या व संस्थेच्या मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन झाले. कांजूर येथील रुग्णसहाय्यक प्रशिक्षण विभागातील विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.
श्रीमती हर्षदा यांचा परिचय, संस्थेच्या विश्वस्त श्रीमती उषाताई बर्वे यांच्या हस्ते सत्कार व प्रमुख पाहुण्यांचे मनोगत हा कार्यक्रम आधी करण्यात आला.
कांजूर, सानपाडा, अलिबाग व कुर्ला विभागातील निवासी मुलांचे, बालिकांचे, विद्यार्थिनींचे व कर्मचा-यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
त्यानंतर प्रमुख वक्ते श्री. सुनील तावडे यांचा परिचय, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विलास ऐनापुरे यांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम झाला. आपल्या मनोगतात श्री. तावडेजी यांनी वात्सल्य मधील कार्यक्रम म्हणजे केवळ निखळ निरामय आनंद असतो अशा शब्दांत कौतुक केले. तसेच संस्थेतील परित्यक्तांच्या पाठीशी हा बाप, हा आजोबा सदैव उभा राहील असे भावपूर्ण आश्वासन दिले.
यानंतर मा. अध्यक्ष डॉ. विलास ऐनापुरे यांचे संस्थेसंबंधीचे प्रास्ताविक झाले. संस्थेने आतापर्यंत निरनिराळ्या क्षेत्रात केलेलं कार्य थोडक्या शब्दांत मांडले. मा. कार्यवाह श्री. श्रीकांत जोशी यांनी संस्थेची भविष्यकाळातील उद्दिष्टे याबद्दल सविस्तर सांगितले.
यानंतर संस्थेच्या कामात निर्व्याज सहभाग देणारे कार्यकर्ते व उत्तम रीतीने काम करणारे कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यांचा अलिबागच्या प्रकल्पप्रमुख श्रीमती शोभा जोशी यांची State Adoptive Resource Authority, SARA या शासनाच्या व्यवस्थापन समितीत नियुक्ती झाली. याबद्दल त्यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. अलिबाग प्रकल्पातील एक कर्मचारी श्रीमती सुहानी पाटील यांचा मुळे ग्रामपंचायततर्फे सरपंच झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. बालिकाश्रमातील कु. पूजा राऊत ही मुलगी पदव्युत्तर शिक्षणासाठी यु.के. येथे जात आहे. तिचा सत्कार करण्यात आला. तसेच १० वी, १२ वी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या मुली कु. जना सोळंके, कु. आरती राठोड, कु. पिंकी केवट, कु. आशा सुधारकर या मुलींचाही सत्कार करण्यात आला.
श्रीमती सचिता देवरुखकर यांनी आभारप्रदर्शन करून मान्यवर व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. या सर्व कार्यक्रमाची फोटोग्राफर श्री. नरेंद्र पेडणेकर यांनी क्षणचित्रे घेतली आहेत. त्यानंतर राष्ट्रगीत सादर झाले. राष्ट्र्गीतानंतर श्री. विद्याधर अपशंकर, ISO Auditor व त्यांचे सहकारी यांनी गाण्यांचा सुरेल कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला उपस्थित रसिकजनांनी उत्तम प्रतिसाद दिला.