भारत देशाच्या स्वतंत्रतेचा अमृत महोत्सव दि. १५.०८.२०२२
वात्सल्य ट्रस्ट मुंबई कांजुरमार्ग प्रकल्पात दि. १५.०८.२०२२ रोजी भारत देशाच्या स्वतंत्रतेचा अमृत महोत्सव खूप जल्लोषात साजरा केला गेला पुनर्वसन केंद्र, संकल्प येथे उपचारासाठी येणा-या सर्व बालगोपालांसोबत संस्थेतील निवासी मुलांचे विविध कार्यक्रम आयोजित केले गेले होते. सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिली. सर्व कर्मचा-यांचे व कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक.
वात्सल्यचे कायमस्वरूपी व जाणते विश्वस्त श्री. ना. सि.सराफ यांच्या हस्ते ध्वजारोहण सकाळी १०.०० च्या सुमारास करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विलास ऐनापुरे व विश्वस्त श्री.जनार्दन कढे यांनी उपस्थिती लावली होती.
सर्व बालगोपाळांची संस्थेच्या आवारातून पोलीस स्टेशन जवळील गणेश मन्दिराप्र्यंत छोटीशी प्रभातफेरी काढली. बालगोपाळांनी विविध जाती धर्माच्या वेशभूषा केल्या होत्या.
सोबत या प्रसंगाची काही क्षणचित्रे :
वात्सल्य ट्रस्ट, मुंबई संस्थेच्या सानपाडा, अलिबाग या शाखांमध्ये स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला गेला. त्याची काही छायाचित्रे :
--